गडचिरोली शहरातील कचरा व्यवस्थापना ,जाळण्याचा प्रकार सुरूचनगरसेवक देशमुखांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

         
गडचिरोली शहरातील कचरा व्यवस्थापना ,जाळण्याचा प्रकार सुरूच
नगरसेवक देशमुखांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

गडचिरोली : नगरपालिकेला लेखी तक्रार देऊनही शहरात उघड्यावर कचरा जाळण्याचा प्रकार सुरूच असल्यामुळे नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नगरसेवक देशमुख यांनी २७फेब्रुवारी रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिडूरकर यांना लेखी निवेदन देऊन शहरातील कचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले होते. निविदेनुसार कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न करता तो उघड्यावर जाळला जात असल्याने परिसरात विषारी धूर पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत

सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास त्याच ठिकाणी पुन्हा कचरा जाळला जात असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच नगरसेवक देशमुख यांनी तातडीने मुख्याधिकारी पिडूरकर यांच्याशी संपर्क करून अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पाठविण्याची मागणी केली. त्यानुसार अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम केले. दरम्यान, कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. असलेल्या

उघड्यावर कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत असू नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे

Comments

Popular posts from this blog

पंचशील बुद्ध विहार, रामनगर, गडचिरोली येथे पाण्याची सोय; नगरसेवक श्रीकांत देशमुख यांचा स्वखर्चातून बोअरवेल करून देण्यासाठी पुढाकार..