पंचशील बुद्ध विहार, रामनगर, गडचिरोली येथे पाण्याची सोय; नगरसेवक श्रीकांत देशमुख यांचा स्वखर्चातून बोअरवेल करून देण्यासाठी पुढाकार..
पंचशील बुद्ध विहार, रामनगर, गडचिरोली येथे पाण्याची सोय; नगरसेवक श्रीकांत देशमुख यांचा स्वखर्चातून बोअरवेल करून देण्यासाठी पुढाकार..
गडचिरोली ,
गडचिरोली शहरातील रामनगर प्रभागातील पंचशील बुद्ध विहार येथे समाजाचे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे कार्यक्रमांना येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येमुळे अनेकदा उपस्थितांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब स्थानिकांनी मांडली होती.
या समस्येची दखल घेत नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख यांनी पंचशील बुद्ध विहार समितीच्या सदस्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. समितीने पाण्याच्या अडचणीबाबत माहिती दिल्यानंतर देशमुख यांनी तत्काळ पुढाकार घेत स्वखर्चातून त्या ठिकाणी बोअरवेल करून देण्याचा निर्णय घेतला.
यानुसार रामनगर येथील पंचशील बुद्ध विहार परिसरात बोअरवेल खोदून मोटार पंप बसवून पाण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता येथे होणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही.
या कार्यामुळे पंचशील बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी नगरसेवक देशमुख यांचे मनापासून आभार मानत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. नागरिकांच्या समस्या ओळखून तत्परतेने उपाययोजना करणारा आणि स्वखर्चातून मदतीचा हात पुढे करणारा नगरसेवक लाभल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
रामनगर प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नगरसेवक श्रीकांत देशमुख यांचे हे कार्य परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.
Comments
Post a Comment