बालाजी आणि NSPC अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या हस्ते सन्मान.


बालाजी आणि NSPC अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या हस्ते सन्मान.
गडचिरोली,
 शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या बालाजी आणि NSPC अकॅडमी येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेहनत, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी अमेय जोशी, ध्रुव मडावी, तन्मय किरंगे व तुषार ताकसांडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे यश हेच समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
यावेळी परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, डॉ. शर्मा सर, नितेश किटे सर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

एटापल्लीत संतापाचा उद्रेक!‘JSW’ कंपनीविरोधात नक्षल बॅनर; “चले जाओ”च्या घोषणांनी परिसर दणाणला

गडचिरोली तेली मोहल्ला (प्रभाग क्रमांक 09 अ) पोट निवडणूक

भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच श्री. रविंद्र पाटील वासेकर यांचा जिल्हाध्यक्ष पद दशकपूर्ती सन्मान सोहळा