6 वर्षे झाली तरी रस्ता नाही,आता तरी डोळे उघडा ; आलापल्ली-सिरोंचा NH पाहणीवर संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचा संताप...!
6 वर्षे झाली तरी रस्ता नाही,आता तरी डोळे उघडा ; आलापल्ली-सिरोंचा NH पाहणीवर संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचा संताप...!
तुम्ही तेलंगणातून एकदा येता,आम्ही रोज जीव मुठीत धरून प्रवास करतो
आलापल्ली : जिल्ह्याच्या दळणवळणासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील 6 वर्षांपासून रखडले आहे.दर्जाहीन काम,भ्रष्टाचार आणि अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय महामार्गचे अधिक्षक अभियंता विवेक नवले आणि एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर प्रफुल केळकर यांनी महामार्गाची पाहणी केली.
पाहणी दरम्यान जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी अधिकाऱ्यांची थेट भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाब विचारला.
संतोषभाऊ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की,गेल्या 6 वर्षांपासून रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदार तसेच दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.आता फक्त पाहणी आणि आश्वासन नको,कृती हवी आहे,अशी ठाम मागणी त्यांनी केली.चर्चेदरम्यान त्यांनी लवकरात लवकर हा राष्ट्रीय महामार्गचा रस्ता क्लिअर करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणीही केली.
पाहणीच्या वेळी एक धक्कादायक बाब समोर आली.अधिक्षक अभियंता विवेक नवले आणि इंजिनीयर प्रफुल केळकर पाहणीसाठी तेलंगणा राज्यातून आले होते.
यावर संतोषभाऊ आणि प्रवासानी तीव्र नाराजी व्यक्त केली.साहेब,तुम्ही फक्त पाहणीसाठी तेलंगणा मधून एकदा येता.पण आम्ही मात्र दररोज जीव मुठीत धरून या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करतो,असे संतोषभाऊ म्हणाले.
नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या,शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही.अपघाताचा धोका नेहमीच असतो,गर्भवती महिलांना आणि रुग्णांना रुग्णालयात नेणे जीवावर बेतते.रुग्णवाहिकाही अडकते,मालवाहतूक ठप्प झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यांचा संग्रहालय,हेच समजत नाही,अशी प्रतिक्रिया संतोषभाऊ ताटीकोंडावार व प्रवाशाने दिली.
पाहणीनंतर अधिक्षक अभियंता नवले यांनी कामाला गती देण्याचे आणि दर्जा सुधारण्याचे आश्वासन दिले.मात्र गेल्या 6 वर्षांच्या अनुभवामुळे नागरिकांचा अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास राहिलेला नाही.
संतोषबाब ताटीकोंडावार यांची इशारा दिला आहे की,जर लवकरात लवकर रस्ता क्लिअर झाला नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही तर राष्ट्रीय माहामार्गवार लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
आलापल्ली-सिरोंचा हा रस्ता तेलंगणा-छेतीसगडला जोडतो.मात्र त्याच्या दुरवस्थेमुळे जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे.
Comments
Post a Comment