सौ.योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सामाजिक बांधिलकीचा आदर्श
सौ.योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सामाजिक बांधिलकीचा आदर्श
गडचिरोली,
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका (माजी नगराध्यक्ष) सौ. योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने इंदिरा गांधी नगरपरिषद शाळा, इंदिरानगर येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात आश्रित वृद्ध माता-पित्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
सौ. योगिताताई पिपरे व इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानंतर मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तूंचे व मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी समाधान व्यक्त करत सौ. योगिताताई पिपरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी इंजि. प्रमोदजी पिपरे, संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे तथा माजी सभापती, नगर परिषद गडचिरोली, माजी नगरसेविका सौ. लताताई लाटकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. देवाजी लाटकर, मुख्याध्यापक श्री. रविंद्र उईके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदीप येलपुलवार, कु. राणीताई पिपरे, रेश्मा शेख, राकेश नंदी, करिश्मा बेंदेवार, शिक्षिका पौर्णिमा कोडाप, शिक्षक योगेश शिडाम, मीनाक्षी दुधे, सुभाष वैरागडे, सरिता भडके, विकेश राजगडे, मनीषा गडपायले, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांचे नागरिकांनी कौतुक करत सौ. योगिताताई पिपरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment