सोमनानी परिवाराकडून शेतमजुरांना रेनकोटचे वाटप -सामाजिक कार्यकर्त्या शीतलताई सोमनानी

सोमनानी परिवाराकडून शेतमजुरांना रेनकोटचे वाटप -
सामाजिक कार्यकर्त्या शीतलताई सोमनानी
वैरागड,
मुसळधार वैरागड पावसाची तमा न बाळगता शेतात दिवसभर कष्ट करत धान रोवणी करणाऱ्या मजुरांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपत वैरागड येथील सामाजिक कार्यकर्त्या शीतल सोमनानी यांनी शेताच्या बांधावर जाऊन महिला व पुरुष मजुरांना रेनकोटचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान लागवडीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते. सततच्या पावसात मजुरांना अनेक तास चिखलात काम करावे लागते. त्यामुळे त्यांना भिजून सर्दी, ताप
तसेच इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन शीतल सोमनानी यांनी शेतात प्रत्यक्ष जाऊन मजुरांची भेट घेत त्यांना रेनकोटचे वाटप केले. यावेळी त्यांनी मजुरांशी संवाद साधत, शेतकरी आणि शेतमजूर हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या कष्टामुळेच अन्नधान्याचे उत्पादन होते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची सामाजिक
जबाबदारी आहे, असे सांगितले. तसेच पावसाळयात आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. रेनकोट मिळाल्याने मजुरांनी आनंद व्यक्त करत शीतल सोमनानी यांचे आभार मानले. पावसात सलग काम करताना आता मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात केवळ सण,
उत्सवापुरतेच नव्हे तर गरजेच्या वेळी समाजपयोगी उपक्रम राबविणे ही खरी समाजसेवा असल्याचे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठी अशा प्रकारचे उपक्रम इतरांनीही राबवावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे शेतमजुरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या कार्याचे वैरागड परिसरात सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी शीतल सोमनानी, माजी सरपंच वैशाली डोंगरवार, रामदास डोंगरवार, सचिन उमरे, सुनील ताडाम, यशवंत रणदिवे, रवींद्र डोंगरवार, पंढरी ठाकूर, आकाश रणदिवे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

एटापल्लीत संतापाचा उद्रेक!‘JSW’ कंपनीविरोधात नक्षल बॅनर; “चले जाओ”च्या घोषणांनी परिसर दणाणला

गडचिरोली तेली मोहल्ला (प्रभाग क्रमांक 09 अ) पोट निवडणूक

भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच श्री. रविंद्र पाटील वासेकर यांचा जिल्हाध्यक्ष पद दशकपूर्ती सन्मान सोहळा