मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देसाईगंज तालुक्यातील मौजा चोप येथे जिल्ह्यातील पहिल्या शेत पांदण रस्त्याचे थाटात लोकार्पण!शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकास पोहोचवणे हेच भाजप महायुती सरकारचे ध्येय - योजनेचे सहअध्यक्ष कृष्णाजी गजबे
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देसाईगंज तालुक्यातील मौजा चोप येथे जिल्ह्यातील पहिल्या शेत पांदण रस्त्याचे थाटात लोकार्पण!
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकास पोहोचवणे हेच भाजप महायुती सरकारचे ध्येय - योजनेचे सहअध्यक्ष कृष्णाजी गजबे
देसाईगंज:--- महाराष्ट्र शासनाच्या अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) तालुक्यात पहिला पांदण रस्ता पूर्ण झाला असून, मौजा चोप येथील श्री घनश्याम भर्रे यांच्या शेतापासून श्री केशव मासुरकर यांच्या शेतापर्यंत या रस्त्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा योजनेचे अध्यक्ष रामदासजी मसराम आणि माजी आमदार तथा योजनेचे सहअध्यक्ष कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले.
लोकार्पणाप्रसंगी योजनेचे सहअध्यक्ष कृष्णा गजबे म्हणाले की, "महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना' सुरू झाल्यानंतर, संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आणि वडसा (देसाईगंज) तालुक्यात पहिल्यांदाच बळीराजा पांदण रस्ता मंजूर होऊन त्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
आज आपल्या महाराष्ट्राचे अत्यंत सक्षम, अभ्यासू आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या या शुभदिनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील आणि वडसा (देसाईगंज) तालुक्यातील 'पहिला बळीराजा पांदण रस्ता' पूर्ण करून तो आपल्या शेतकरी बांधवांच्या सेवेत समर्पित करताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान होत आहे. ही खऱ्या अर्थाने आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना गडचिरोली जिल्ह्यातील बळीराजाने दिलेली एक अनोखी व विकासात्मक भेट आहे.
आपले भाजप महायुती सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीतून 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना' सुरू झाली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ताच नसलेल्या आणि पावसाळ्यात हाल सोसणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी हे सरकार धावून आले आहे. पूर्वी पांदण रस्त्यांसाठी निधी आणि मंजुरीची मोठी कसरत करावी लागायची; पण आमच्या सरकारने अत्यंत सुटसुटीत आणि वेगवान यंत्रणा तयार करून थेट बांधापर्यंत रस्ते पोहोचवण्याचे काम केले आहे. केवळ मौजा चोपच नाही, तर आरमोरी विधानसभा क्षेत्रातील तील प्रत्येक गावात शेत पांदण रस्ता टप्प्याटप्प्याने पक्का आणि दर्जेदार करून पूर्ण करणे हाच आमचा संकल्प आहे. भाजप सरकारचा हाच खरा विकास आहे!
या पांदण रस्त्यामुळे मौजा चोप व परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाणे-येणे अतिशय सोपे होणार असून शेतमाल वाहतुकीची मोठी सोय झाली आहे.
या लोकार्पण प्रसंगी देसाईगंज चे उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान, तहसीलदार डूडुलकर मॅडम, चोप चे सरपंच नितीन लाडे, गौरव नागपूरकर, आत्माराम सूर्यवंशी, राधेश्याम बरैया, केशव मासुरकर, केशव पाटील लांजेवार, घनश्यामजी भारे, नरेश बनपूरकर, कंत्राटदार रवींद्र गोटेफोडे, शिवम गोटेफोडे यांसह महसूल विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक-शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment